सुनिर्मल फाउंडेशनच्या वतीने पत्रकार/कवी सनी आडेकर"साहित्य गौरव पुरस्काराने" सन्मानित
धारावी येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत अशी सुनिर्मल फाउंडेशन हि संस्था सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान व कामगिरी करत समाजातील समस्येवर मदतीचे करत आलेली आहे. सामाजिक कर्तव्य पार पाडत विविध उपक्रम सातत्याने राबवत मुलांना शैक्षणिक क्षेत्रात, शिवाय कोविड काळात ही आरोग्य विषयक उपक्रम राबवुन ,तसेच साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मनापासून कार्य करणाऱ्या व प्रसिद्धी पासून दूर राहणार्या घटकांचा यथोचित सन्मानित केले जाते.
यावेळी पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवर म्हणून लाभलेले असे मुंबईचे मानणीय नगरपाल डॉ. जगन्नाथ राव हेगडे, दै.प्रहार चे संपादक श्री. सुक्रत खांडेकर, फिल्म सेंन्साँर बोर्ड दिल्ली सदस्य श्री. विलास खानोलकर, आणि जेष्ठ शिक्षण तज्ञ साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर,यांना पाहुणे म्हणून यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. मान्यवरांची विविध समर्पक, प्रोत्साहन पर विषयावर भाषणे झाली. यावेळी कवींनी आपली दर्जेदार कविता सादर करत कार्यक्रमात रंगत आणली शालेय विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पुरस्काराचे सन्मान पुर्वक मान्यवरांच्या हस्ते वितरण करत, व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गौरवास्पद बाब म्हणजे सुनिर्मल साहित्य गौरव हा सन्मान पत्रकार/कवी श्री. सनी आडेकर यांना सलग दुसर्या वर्षी ही जाहीर झाला. त्यांना भावी साहित्य सेवेसाठी सर्व च स्तरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
0 Comments