नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील वाखारी येथे खासगी वैद्यकीय (Medical) व्यवसाय करणाऱ्या डाॕ. नारायण महारू सागर (वय ६५) यांनी स्वतःला चालत्या रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपविली.
आत्महत्येचे (Suicide) कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Doctor
शुक्रवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाखाली लोहमार्गाजवळ डॉ. सागर आपली दुचाकी उभी करून थांबले होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने त्यांना हटकले. त्याचवेळी समोरून येणारी मालगाडी बघताच अचानक त्यांनी स्वतःला झोकून दिले. वाखारी येथील टॅक्सीचालक भाऊसाहेब सोनवणे यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सागर यांना जखमीवस्थेत ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला. विच्छेदानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी वाखारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.



0 Comments