*पंढरपूर सिंहगड मध्ये "नाॅन कनव्हेशनल मशिनिगं" याविषयावर व्याख्यान*
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा. ए. एस. जेऊरकर यांचे स्वागत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जेऊरकर म्हणाले, आधुनिक उद्योजकेतेसाठी अपारंपरिक मशिनिगं शिकण्याची गरज नव अभियंत्यांना आवश्यक आहे. इलेक्ट्रीकल मशिनिगं, इलेक्ट्रीकल डिस्चार्ज मशिनिगं, एब्रेजिव वाॅटेर जेट मशिनिगं इत्यादी पद्धतीवर आधारित उद्योजकेतेसाठी गरज असल्याचे मत प्रा. जेऊरकर यांनी सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
हे व्याख्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होतो. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, प्रि. अतुल कुलकर्णी सह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments