पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्यातील मावळ येथील नायगावात (Maval, Naigaon ) एक दुर्दैवी घटना घडली.
नेमकी काय घटना?
आई पूनम शिंदे ,मुलगा युवराज शिंदे आणि मावशी संगीता लायगुडे हे तिघेही इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज हा नदी मध्ये पोहण्यासाठी उतरला. नदी मधील खोल कुंडाचा अंदाज न आल्याने दम लागून तो बुडू लागला. मुलगा बुडतोय हे लक्षात येता आई पुढे मदतीसाठी सरसावली.
जवळच असलेल्या युवराज शिंदेची आई पूनम शिंदे या गोधड्या धुवत होत्या. त्यावेळी युवराज बुडत असल्याचे दिसताच आई पूनम शिंदेने देखील नदीच उडी घेत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सूरु केले. मात्र ते कुंड खोल असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
पूनम शिंदे यांची बहीण संगीता लायगुडे ह्यांनी देखील या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही. अखेर संगीता लायगुडे यांनी युवराज आणि पूनम शिंदे यांना बाहेर काढत कामशेत मधील खाजगी रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. या घटनेमुळे शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण मावळमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.
0 Comments