Pandharpur Live Online : उत्तर सोलापूर तालुक्यांतील बीबी दारफळ येथे शेतातील घराची भिंत अंगावर काेसळून मुलाचा मृत्यू झाला. प्रणव पुरुषोत्तम ननवरे (वय ९) असे मृत नाव आहे.
अधिक माहिती अशी, रविवारी सुट्टी असल्यामुळे प्रणव हा वडिलांसोबत शेतात गेला होता. चारच्या सुमारास पाऊस आल्याने शेतातील घरात थांबला होता. यावेळी पावसाने भिजून कमकुवत झालेली भिंत वा-याच्या दाबाने भिंत प्रणवच्या अंगावर कोसळली.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला. जवळ असलेल्या वडीलांनी त्याला उपचारासाठी छत्रपती सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या मृत्यूने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments