इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे.
पटेल यांचं घर असलेली बिल्डींग DHFL कडून डेव्हलप करण्यात आले होते. दरम्यान पटेल आणि त्यांचं कुटुंब हे प्लॅट सध्या वापरू शकणार आहेत मात्र त्यांची विक्री ईडीच्या परवानगीशिवाय त्यांना करता येणार नाही. इक्बाल मिर्ची याने हा प्लॅट खरेदी केला होता, आणि त्यानंतर हा एका डेव्हलपरने हा प्लॅट डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लाँड्रीग करण्यात आल्याचा आऱोप आहे.
स्त्रोत: सकाळ
0 Comments