स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्त सर्वच शासकीय कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज तालुका पोलीस स्टेशन, पंढरपूर यांच्या वतीने दौडचे आयोजन करण्यात आले होते .

सर्व नागरिकांनी आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज लावून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरिक्षक पाटील यांनी यावेळी केले. सदर दौड जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
0 Comments