फको टोकिओ" या कंपनीचे जनरल इन्शुरन्स वर्तुळात खुप मोठ नाव आहे. कंपनीच्या धोरणामध्ये निष्पक्षता, विमाकर्ता आणि ग्राहक यांच्यातील पारदर्शकता जोपासली जाते. अशा कार विम्याच्या बाबतीत, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स त्यांच्या पॉलिसीधारकांना सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करते, त्यांना त्यांच्या कारचे अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती आणि इतर अनपेक्षित घटनांपासून संरक्षण प्रदान करते. विमा योजना ज्यामध्ये थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी आणि परवडणाऱ्या प्रीमि
यम दरांमध्ये सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी समाविष्ट असते. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या आटपाडी तालुक्यातील कुमार शिवशंकर जगदीश देशमुख यांची निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
जापनीज कंपन्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले जापनीज भाषेचे प्रशिक्षण एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येते. जापनीज कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी जापनीज भाषांमध्ये लिहणे, बोलणे आणि वाचणे इत्यादी गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक असते. असे प्रशिक्षण सिंहगड कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. जापनीज भाषेचे प्रशिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे एकमेव महाविद्यालय आहे.
"इफको टोकिओ" कंपनीकडून शिवशंकर जगदीश देशमुख यांना वार्षिक ३. ८५ वार्षिक पॅकेज मिळणार आहे. त्याच्या या यशाबद्दल काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. शिरीष कुलकर्णी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments