पंढरपूर , दि . १५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( ७५ वा ) अंतर्गत 'हर घर झेंडा' हा उपक्रम दि .१३.०८.२२ ते दि . १५.०८.२२ या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय व निमशासकीय / खासगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांचे इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी हर घर झेंडा राबविणेबाबत कळविले आहे .
त्याप्रमाणे श्रीविठ्ठल साखर कारखान्यामार्फत 'हर घर झेंडा' या केंद्राच्या उपक्रमामध्ये सहभागी होणेसाठी दिनांक १५/०८/२०२२ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांचे शुभहस्ते व व्हाईस चेअरमन सौ . प्रेमलता रोंगे यांचे उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकविण्यात आला .
चेअरमन श्री अभिजीत ( आबा ) पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहून ज्या थोर देशप्रेमींनी देशासाठी बलीदान केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवून त्यांना हृदयस्थानी मानले पाहिजे . प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेल्या हुताम्यांना अभिवादन करुन देशाभिमान जपावा , असे मत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण , नवनाथ नाईकनवरे , दत्तात्रय नरसाळे , धनंजय काळे , जनक भोसले , प्रविण कोळेकर , अशोक जाधव , साहेबराव नागणे , कालिदास पाटील , कालिदास साळुंखे , संभाजी भोसले , सचिन वाघाटे , सुरेश भुसे , बाळासाहेब हाके , सिताराम गवळी , सिध्देश्वर बंडगर , सौ . सविता रणदिवे , श्रीमती कलावती खटके , दशरथ जाधव , अशोक तोंडले , तुकाराम मस्के व कारखान्याचे सर्व अधिकारी , कर्मचारी वर्ग , कार्यकर्ते , सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments