*कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये स्वातंत्रदिन उत्साहात संपन्न*
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित, कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे पंढरपूर इथे स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा केला गेला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी, लोणेरे चे डॉ. एस बी देवोसरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. भारतामध्ये युवा शक्तीचा खूप मोठा इतिहास आहे. समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याची ताकद युवकांमध्ये आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
0 Comments