पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने सोमवार २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजला सृजनरंग २०२०-२१ या नियतकालिकास प्रथम क्रमांक चे बक्षीस उच्च व तंत्र शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांचे कडून अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख व प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी स्विकारला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य महाराष्ट्र राज्याचे मंञी चंद्रकांत पाटील हे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस होत्या.
विद्यापीठात कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा पहिला दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये अद्विक सृजनरंग स्पर्धेतील अद्विक या नियतकालिकास प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय काय मंञी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अधिष्ठिता डाॅ. संपत देशमुख व प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह सह स्विकारला.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजच्या अद्विक सृजनरंग नियतकालिकास प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्राचार्य डॉ कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.



.jpg)
0 Comments