कायद्याची माहिती सर्वांनी असणे आवश्यक आहे. कायदे काय आहेत ते कसे तयार होतात याबाबत माहिती आवश्यक आहे. कोर्टाचे अधिकार हे सविधानात्मक आहेत. ते प्रत्येकांनी वाचले पाहिजेत. जीवन सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कायद्याची भीती असणे आवश्यक आहे. स्वतःच्या हातून कोणती घटना घडून नये याची काळजी घ्या. कायद्याची ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे मत दिवाणी न्यायाधीश ए. ए. खंडाळे यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बुधवार दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी "विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराची सुरवात मान्यवरांच्या हस्ते विद्येचे आराध्य दैवत सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आली. या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर येथील सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तरावरील ए. ए. खंडाळे यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. याशिवाय सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती टी. जी. बन्सोड यांचे स्वागत प्राध्यापिका अंजली चांदणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या व्याख्यान मार्गदर्शन करताना श्रीमती ए. एस. बेल्हेकर बोलताना म्हणाल्या, अलीकडेच्या काळात ऑनलाईन फसवणूक खुप मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मिडीयाचा वापर खुप काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याचे मत श्रीमती ए. एस. बेल्हेकर यांनी सांगितले.
अँड. राहुल बोडके बोलताना म्हणाले, रॅगिंग होत असले तर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. रॅगिंगच्या शिक्षेचे स्वरूप खुप भयानक आहे. दोन वर्ष कारावास होऊ शकतो. शैक्षणिक संस्थेत अथवा बाहेर रॅगिंग होत असेल तर कायदेशीर मार्गाने गेल्यास न्याय मिळू शकतो असे मत अँड. राहूल बोडके यांनी सांगितले
अँड. भगवान मुळे मार्गदर्शन करताना म्हणाले, कायद्याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे. एखादी घटना घडल्यानंतर कायद्याच्या आधारावर न्याय मिळवता येतो म्हणून कायद्याची माहिती आवश्यक आहे. शासकीय योजनेची माहिती सर्वाना आवश्यक आहे. आमली पदार्थ सेवन केल्यास त्याचा परिणाम स्वतःच्या शरीरावर व कुटुंबावर होत असतो. जे लोक आमली पदार्थ सेवन करतात अशा लोकांना परिवर्तन करणे आवश्यक असल्याचे मत अँड. मुळे यांनी व्यक्त केले.
यादरम्यान श्रीमती टी. जी. बन्सोड, सिंहगडचे काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, अँड. एम. एम नाईकनवरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या शिबीराचे सुञसंचलन अँड. राहुल बोडके यांनी केले तर उपस्थितांचे काॅलेजचे उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.



0 Comments