केळी विकत घेताना लक्ष द्या अन्यथा... काय होऊ शकतं पाहा

 निसर्ग  कायम काही तरी चमत्कार दाखवतो. ज्याची आपण कोणीच कल्पना करु शकत नाही. निसर्गाच्या कुशीत अनेक रहस्य लपले आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला एक सुकलेल्या पानासारखं दिसणारं फुलपाखरु दाखवं होतं.


आता तसाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पहिले हा व्हिडीओ बघा...काय दिसतं आहे यात तुम्हाला या व्हिडीओमध्ये एका टेबलवर दोन केळी आहे. प्रथमदर्शनी सगळ्यांना तसंच वाटतं. हा व्हिडीओ म्हणजे तुमची फसवणूक...कसं ते पाहा...

बघितलं...नीट पाहा जरा...तुम्हाला नेमकं काय दिसतं आहे. दोन केळी की अजून काही...त्या एका केळीच्या बाजूला केळीसारखंच हुबेहुब दिसणारा साप आहे. हो हा एक साप आहे.

या सापाचं शरीर केळीसारखं दिसतं. त्यामुळे केळ आणि सापाला एकत्र पाहिल्यावर त्यांच्यातला फरक क्वचितच कुणाला दिसेल...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सचे डोके चक्रावले आहेत. अनेक जण अजूनही गोंधळतात आहे की तो साप आहे की केळी.

जगात अनेक प्रकारचे साप आढळत, पण हा केळ्यासारखा दिसणारा हा साप बनाना बॉल पायथन या नावाने ओळखला जातो. केळीसारखे दिसल्याने या सापाला केळीच्या नावावरूनच ओळखलं जातं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाला हाताने उचलताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालेले युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.


Post a Comment

0 Comments