पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.
आज पंढरपूर लाईव्ह च्या नव्या स्टुडिओतील श्रीगणेशाची सकाळची पुजा व आरती पंढरपूरमधील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. श्री. मनोज भायगुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री. भायगुडे यांनी विघ्नहर्ता गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी प्रमोद गुंड-पाटील आदी उपस्थित होते.








0 Comments