पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.
आज सकाळची 'श्री' ची पुजा व आरती पत्रकार सुरक्षा समिती या संघटनेचे पत्रकार बांधव पत्रकार रामभाऊ सरवदे, पत्रकार दत्ताजीराव पाटील, पत्रकार विनोद पोतदार, पत्रकार अपराजित सर्वगोड व पत्रकार कबीर देवकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी सर्वांचे आभार मानले.







0 Comments