म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल (रविवारी) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी व राजापूर धरणाखालील परिसरात घडली.
ही माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, गुंजाळवाडीचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, राजापूरचे उपसरपंच बादशहा हासे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय महाले, सचिन उगले, ग्रामसेवक परमेश्वर आहेर हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
जलतरणपटू अॅड. सदाशिव थोरात यांच्यासह परिसरातील ज्ञानेश्वर हासे, बाबजी हासे या पोहणार्या तरुणांनी बुडालेल्या साहिल कातोरे याचा शोध सुरू केला. काही वेळाने त्याला नदीपात्रातून बाहेर काढले. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत संगमनेर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




0 Comments