सोलापूर: शिकारीसाठी तुरीच्या शेतात जाळे लावून बसलेले चौघे ताब्यात

 सोलापूर : तितर या वन्यपक्ष्यांची शिकार करताना वनविभागाने चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तितर पक्षी, मोबाईल व पिंजरा पोलिसांनी जप्त केला आहे.


कारवाई बेलाटी (ता. उ. सोलापूर) येथे करण्यात आली.

वनपरिक्षेत्र सोलापूर अंतर्गत नियतक्षेत्र बेलाटी येथील शेतामध्ये काही लोक वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जाळे लावून बसले असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती.


 दरम्यान, वनसंरक्षक एल. ए. आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाने यांच्यासह क्षेत्रीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.


 त्यावेळी महेश जनार्धन मसाळ यांच्या शेतामध्ये चौघे तितर पक्ष्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने बसल्याचे दिसून आले. त्या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले. 


सदर प्रकरणामधील आरोपी ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाने हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments