केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील दोन बेपत्ता महिलांचे मृतदेह केरळ पोलिसांना सापडले आहेत. दोन्ही महिला उदरनिर्वाहासाठी लॉटरीची तिकिटं विकायच्या.
दोन महिलांमध्ये एक साम्य होतं, ते असं की बेपत्ता होईपर्यंत त्या कोचीमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र जात होत्या. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक महिला रोजली (49) 6 जून रोजी बेपत्ता झाली होती आणि दुसरी महिला पद्मम (52) तीन महिन्यांनी 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. केरळ पोलिसांनी
दोन्ही महिलांच्या शरीराचे अवयव पथनमथिट्टा जिल्ह्यातील इलानथूर गावात पारंपरिक उपचार करणार्या व मसाजर असलेल्या व्यक्तीच्या घराच्या आवारातून जप्त केले. या प्रकरणी कोची शहर पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.
कोची शहराचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांच्या मते, या दोन्ही बेपत्ता महिलांचा आर्थिक भरभराटीसाठी मानवी बळी देण्यात आला. हे काम यशस्वी करण्यासाठी महिलांचा छळ करून जीवे मारण्यात आलं.
पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये मसाजर भगवल सिंह, त्याची पत्नी लैला आणि कोची येथील रेस्टॉरंट मालक मोहम्मद शफी उर्फ रशीद यांचा समावेश आहे. आरोपींनी पीडितांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं होतं.




0 Comments