सोलापूर; पीकअप झाडावर आदळून मोहोळ तालुक्यांतील दोन युवक ठार

 मोहोळ(सोलापूर);  पिकअप जीप झाडावर आदळल्‍याने मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथील दोन युवक जागीच ठार झाले आहे.


 ही दुर्घटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता पुणे जिल्ह्यातील बोरीभडक (ता.दौंड) गावच्या शिवारा जवळ सोलापूर-पुणे महामार्गावर घडली. गौतम भागवत ओव्हाळ (वय २५), रणजित पोपट डोंगरे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथील गौतम ओव्हाळ व रणजित डोंगरे हे दोघे पपईने भरलेली पिकअप जीप (एम.एच ४५/९५१६) घेऊन आढेगावहून पुण्याकडे निघाले होते. 


मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता त्यांची पिकअप दौंड तालुक्यातील बोरीभडक गावच्या शिवारात आली असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचेही मृतदेह क्रेनच्या साह्याने बाजूला काढावे लागले. याबाबत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments