एकाच कुटुंबात वाद अन् गोळीबार ... तीन ठार

 राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील भुसावर पोलीस स्टेशन हद्दीतील पटाईना गावात एकाच कुटुंब झालेल्या वादामुळे जोरदार गोळीबार झाला, यात एका राजस्थान पोलिसासह तीन जण ठार झाले.


तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही पक्ष एकाच कुटुंबातील असल्याची माहिती भुसावर पोलीस ठाण्याने दिली आहे. त्यांच्यात बरेच दिवस वैर सुरू होते. याच वैमनस्यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले आणि बंदुक, लाठ्या, कुऱ्हाडी निघाल्या. या संपूर्ण घटनेत पिता-पुत्रासह तिघांचा मृत्यू झाला आहे.


गोळीबाराची  माहिती मिळताच भुसावर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना भरतपूर येथील आरबीएम रुग्णालयात नेले. येथे तीन जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 55 वर्षीय ब्रिजेंद्र सिंह आणि त्यांचा 28 वर्षीय मुलगा हेमू उर्फ ​​हेमराज आणि 24 वर्षीय मुलगा किसन अशी मृतांची नावे आहेत. मृत किसन राजस्थान पोलिसात हवालदार पदावर कार्यरत होता. 


जवळपास दहा मिनिटे दोन्ही बाजूंमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता, असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. गोळी झाडल्यानंतर येथे आरडाओरडा झाला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गोळीबारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पिता-पुत्र दोघांनाही भुसावळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह भरतपूर येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात आणले असून त्यांचे सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी दुसऱ्या बाजूने तिघांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments