सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली ; शिरीष एल . सरदेशपांडे नवे पोलीस अधीक्षक

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिरीषकुमार एल. सरदेशपांडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले.

नवे पोलीस अधीक्षक हे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. शासनाने काढलेल्या आदेशात तेजस्वी सातपुते यांच्या बदली बाबतचा उल्लेख केला असला तरी अद्याप त्यांची बदली कोठे झाली याबाबतचा स्वतंत्र आदेश पुन्हा काढण्यात येईल असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला. पोलिस दलातून नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर आज गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या 23 आयपीएस अधिकाऱयांबरोबर दोघा उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.


धनंजय कुलकर्णी (रत्नागिरी), पवन बनसोड (सिंधुदुर्ग), बसवराज तेली (सांगली), शेख समीर अस्लम (सातारा), अंकित गोयल (पुणे ग्रामीण), शिरीष सरदेशपांडे (सोलापूर ग्रामीण), राकेश ओला (नगर), एम. राजकुमार (जळगाव), रागसुधा आर (परभणी), संदीप सिंह गिल (हिंगोली), श्रीकृष्ण कोकाटे (नांदेड), सोमय मुंडे (लातूर), सारंग आवाड (बुलढाणा), गौरव सिंह (यवतमाळ), संदीप घुगे (अकोला), रविंद्रसिंग परदेशी (चंद्रपूर), नुरूल हसन (वर्धा), निखिल पिंगळे (गोंदिया), निलोत्पल (गडचिरोली), संजय बारकुंड (धुळे), श्रीकांत परोपकारी (ठाणे शहर), सचिन पाटील (संभाजीनगर), सिंगुरी आनंद (नागपूर ग्रामीण). 


तर मपोसे असलेले उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), पराग मणेरे (विशेष सुरक्षा विभाग, मुंबई).

याशिवाय मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे व प्रवीण पाटील या भा.पो.से. तसेच निकेश खाटमोडे या राज्यसेवेतील अधिकाऱयांची बदली करण्यात आली असून त्यांच्या नव्यानियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.


या अधिकाऱयांच्या बदल्या, पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निघणार

मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रवीण पाटील, या भा. पो. से. अधिकाऱयांची आणि निकेश खाटमोडे, रा. पो. से. या अधिकाऱयांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत

Post a Comment

0 Comments