अतिवृष्टीमुळे पीक गेले, कुटुंबाच पोट भरायच कसं,? दोन शेतकऱ्याची आत्महत्या

 अतिवृष्टीमुळे पीक गेल्याने आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना माळेगाव (ता.आर्णी) येथे सोमवारी रात्री घडली. प्रेम धनू पवार (४५) असे मृताचे नाव आहे.

घटनेची माहिती माळेगाव येथील पोलीस पाटील कांबळे यांनी पाेलिसांना दिली. ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी माळेगाव येथे दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रेम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.


सततच्या नापिकीला कंटाळून एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.


संताराम नारायण ढवळे (७५) रा. केसलवाडा (वाघ) असे मृताचे नाव आहे. त्यांची गराडा शेतशिवारात ०.२९ हेक्टर शेत आहे. काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाले.


 यामुळे चिंतेत असलेल्या संतारामने मंगळवारी घरातील आड्याला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना व महसूल विभागाला देण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

Post a Comment

0 Comments