लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

 

    बारामती : चप्पल व्यवसायासाठी दिलेल्या १ लाख ४० हजार रुपयांवरुन लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावाचा चाकूने वार करीत निर्दयपणे खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील अमरसिंह कॉलनी येथे (दि २८) रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली.


    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंह कॉलनी माळेगांव येथे रहात्या घरी आरोपी मंथन अरुण धुळप ( वय २३) याने मोठा भाऊ कल्पेश अरुण धुळप ( वय २६) यास आठ दिवसांपूर्वी चप्पल व्यवसायासाठी १ लाख ४० हजार रुपये दिले होते,


     त्याचे तु काय केले? अशी विचारणा केल्यावर कल्पेश याने ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले असून, माझ्या खातेवर आता पैसे नसुन मी नंतर देतो, असे मंथनला सांगितले असता तो चिडला.


    यामुळे कल्पेशने मंथनला हाताने बुक्क्यांनी छातीवर मारहाण केली असता, मंथनने कपाटातील चाकु घेऊन कल्पेशच्या मानेवर व छातीवर वार केले.


    या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कल्पेशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सुरेखा अरुण धुळप यांनी फिर्याद दिली असून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक देविदास साळवे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments