डॉक्टराकडून मागितली सात लाखाची खंडणी

 ळगाव - शहरातील रामानंदनगर परिसरातील वास्तव्याला असलेल्या चाळीसवर्षीय डॉक्टरांकडे हनी ट्रॅपमध्ये अडकवून सात लाखांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज्यात व देशात अनेक ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार उघड झाले आहेत. रामानंदनगर भागात राहणारे हे डॉक्टर नूतन मराठा महाविद्यालयासमोरील रुग्णालयात सेवा बजावतात. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान काही तरुण-तरुणींनी त्यांना अडकविण्याच्या उद्देशाने कट रचला. एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर केली. त्याचे भ्रमणध्वनीमध्ये चित्रीकरण केले.


 चेतन व हिरामण नावाच्या दोघांनी डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितली. यापैकी एक तरुणी शहरातील, तर दुसरी यावल तालुक्यातील आहे. प्रदीप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी केली.


सात लाख रुपये न दिल्यास ध्वनिचित्रफीत प्रसारित करून तुमची समाजात बदनामी होईल. जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली, असे डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


 याप्रकरणी चार महिलांसह चेतन्र कासार, हिरामण जोशी, प्रदीप कोळी-सैंदाणे, संदीप लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments