मंगळवेढा; पेढा देवून करणी केल्याचा संशय

 पेढा खायला देवून करणी केल्याच्या संशयावरून जावेला व तीच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी


जाऊ द्राक्षणी भिमाशंकर राजमाने (वय 45) व राकेश भिमाशंकर राजमाने या दोघा मायलेकरांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून ही घटना अरळी येथे घडली आहे.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रेखा श्रीशैल्य राजमाने या दि.19 रोजी सकाळी 9.30 वा. अरळी गावचे शिवारात असताना


वरील आरोपीने आम्हाला पेढा खायला देवून तु करणी केली आहे. या संशयावरून फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा विक्रांत यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान, यातील फिर्यादी व आरोपी या सख्या जावा असून याचा अधिक तपास पोलिस हवालदार कोळी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments