भटक्या कुत्र्यांनी ७ महिन्याच्या बाळाचे तोडले लचके

 देशातील प्रत्येक शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली आहे. श्वानांचे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठीही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.


उत्तर प्रदेशात तर उच्चभ्रू वसाहतीत कुत्र्यांची समस्या वाढली आहे. नुकतेच नोएडातील सेक्टर-100 मध्ये लोटस बुलेवर्ड सोसायटीत भटक्या कुत्र्यांनी सात महिन्यांच्या चिमुकल्याचे लचके तोडल्याचा प्रकारसमोर आला.


 यात या मुलाचा मृत्यू झाला आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचं आतडं बाहेर आलं होतं.



सेक्टर- 39 ठाणे क्षेत्रातील पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. मूळ मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश आणि त्यांची पत्नी मजुरीचे काम करतात. नोएडात भाड्याने खोली घेऊन ते राहतात. या दाम्पत्याला सात महिन्यांचा अरविंद नावाचा मुलगा होता.


सेक्टर-100 मध्ये लोटस बुलेवर्ड सोसायटीत या दाम्पत्याला दुरूस्तीचे काम मिळाले होते. ते दोघे चिमुकल्याला घेऊन सोसायटीत कामाला जात होते. 17 ऑक्टोबरला ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. त्यांनी कामाच्या ठिकाणी एक चादर टाकून तिथे अरविंदला झोपवलं होतं.

Post a Comment

0 Comments