औरंगाबाद: महापालिकेच्या बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याने डोके बाहेर काढताच बस वळण घेत असताना त्याचे डोके भीतीला घासले यात मुलाचा करूण अंत झाला. हरिओम राधाकृष्ण पंडित (रा. बजाजनगर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
शहरातील औरंगपुरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर महापालिकेच्या बस थांबतात. दरम्यान साजापूर ते औरंगपुरा या बसच्या फेऱ्या संपल्या होत्या, त्यामुळे बस मैदानात जाण्यासाठी वळण घेत होती, त्याच दरम्यान पुढच्या दरवाजाने हरिओम हा चढला.
त्याच्या पाठोपाठ आठ नऊ विद्यार्थी चढले. हरिओम बसमध्ये चढताच थेट मागच्या सीटवर जाऊन बसला, आणि डोके बाहेर काढले.
त्याच वेळेस बस वळण घेत असताना बाहेर काढलेले डोके मैदानाच्या भीतीला आणि गेटच्या अँगल घासले. अन हरिओम डोक्याला गंभीर मार लागला.
त्याला ताक्ताळ महिला रिक्षाचालक आणि होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या अनिता पारपल्ली यांच्यासह बसचालक कपिल लोखंडे यांनी घाटीत दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरिओमला मृत घोषित केले. तो सरस्वती भुवन शाळेत नववीत शिकत होता.




0 Comments