'प्रत्येक घाटात मला हा भास होतो, आदिनाथ कोठारेची ती पोस्ट चर्चेत

 दिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून ओळखले जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो केवळ एक अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे.


काही दिवसांपूर्वी आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने दौलतराव देशमाने ही प्रमुख भूमिका साकारली होती. त्याबरोबरच ८३ या बॉलिवूड चित्रपटातही त्याने काम केले होते. त्याची ही भूमिकाही प्रचंड गाजली. नुकतंच आदिनाथने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दल पोस्ट शेअर केली आहे.


आदिनाथ हा इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असतो. नुकतंच त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दल एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने घाट-रस्त्यांवरील ड्रायव्हिंगबद्दल सांगितले आहे. यात आदिनाथने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.


लहानपणी मुंबई पुण्याचा जुना घाट चढत अस्ताना माझी आज्जी सतत देवाचं नाव घेत रहायची. प्रत्येक वळणावर तीची श्रद्धा आणी तीची काळजी वाढत जायची. मी मागच्या सीटवर तीच्या आणि आईच्या मधे बसायचो. मला ती सगळी स्तोत्र पाठ झाली होती आणी मी पण गम्मत म्हणून तीच्या सोबत म्हणायचो.


आज आज्जी खूप म्हातारी झालीये आणी तीला ती स्तोत्र कदाचीत आठवतही नसतील. पण तो घाट आजही आहे. रस्ता जरा सोयीचा झाला असला तरी ती वळण तशीच आहेत. त्या वळणांवरून जाताना आज गाडीत आज्जी नस्ते. पण ती स्तोत्र आपोआप आठवतात. मी मनातल्या मनात म्हणतो. अचानक खूप सुरक्षित वाटायला लागतं. आपल्या आज्जीच्या आणि आईच्या कुशीत बसून मी प्रवास करतोय असं वाटतं.

आयुष्याच्या प्रत्येक घाटात मला हा भास होतो”, असे कॅप्शन आदिनाथ कोठारेने दिले आहे.

Post a Comment

0 Comments