गुप्तधनाच्या आमिषाने फसवणूक, मांत्रिकासह ११ जणांवर गुन्हा

 कोल्हापूर : घरातील गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने शुक्रवार पेठ येथील आरती सामंत या महिलेची चार लाख 40 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी शिरोली पुलाची (ता.


हातकणंगले) येथील मांत्रिकासह 11 जणांवर मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा जादूटोणा कायद्यान्वये संशयितांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मांत्रिकांसह साथीदारांनी आरती सामंतला गुप्तधनाचे आमिष दाखविले. त्यासाठी शुक्रवार पेठ येथील घरात 15 फूट खोल खड्डा काढून त्यात बकर्‍यांचा बळी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने अधिकारीही चक्रावले आहेत.


संशयित मांत्रिक किशोर भगवान लोहार (शिरोली पुलाची), नामदेव शामराव पोवार (जोगेवाडी, राधानगरी), बाळू रामचंद्र सुतार (लक्षतीर्थ वसाहत), अक्षय अनिल हेगडे (कंदलगाव, करवीर), गजानन भगवान लोहार (शिरोली पुलाची), अनिल लक्ष्मण सुतार (शिरोली पुलाची), शशिकांत कांबळे (उजळाईवाडी परिसर), राजन (शिरोली पुलाची), वैभव चौगुले (कसबा बावडा), फडणीस महाराज अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.


शुक्रवार पेठ येथील पंचगंगा हॉस्पिटल परिसरात राहणार्‍या आरती अनंत सामंत (वय 45) यांचा पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील रस्त्यालगत शेतवडीत डोक्यात वर्मी हल्ला करून खून करण्यात आला होता. दि. 30 सप्टेंबरला सायंकाळी ही घटना घडली होती. करवीर पोलिसांनी जोगेवाडी (ता. राधानगरी) येथील मांत्रिक नामदेव शामराव पोवारला अटक केली होती.

Post a Comment

0 Comments