अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील पाझर तलावात एक मृतदेह 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास आढळून आला.
मृत व्यक्तीचे नाव प्रविण लक्ष्मण चिंतलवाड (35) रा. कारेपूर जवळील सय्यदपू ता रेणापूर येथील असल्याचे प्राथमिक माहीती वरून समजले.
घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस तलावावर दाखाल होऊन तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.
पोलीस स्टेशनचे सपोनि शैलेश बंकवाड, पोलीस कॉन्स्टेबल पलमटे, महाके, कोळी,गोरे, पोलीस पाटील मुज्जफर देशमुख, हामीद पठाण, अमीर पठाण, महमद शेखआदीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. आत्महत्या की हत्या याबाबत किनगाव पोलीस तपास करीत आहेत.




0 Comments