मदत करायची सोडून ती तडफडत असताना निर्दयी लोकं व्हिडिओ काढत राहिले

 उत्तर प्रदेश याराज्यातील कन्नोजमध्ये एक संतापजनक घटना समोर आलीय. गंभीर जखमांमुळे तडफडत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा  अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आलाय.


व्हिडीओमध्ये मुलगी मदतीची भीक मागत होती. पण समोर असलेले निर्दयी लोक या मुलीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल झालाय. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा अंगावर शहारे आणणारा थरारक घटनाक्रमही समोर आला आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये एका अल्पवयीन मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत शेतातील सुकलेल्या गवतात पडली आहे. तिच्यासमोर काही लोक उभे असलेले दिसून आलेत. ही मुलगी मदतीसाठी समोर उभ्या असलेल्या लोकांकडे कळकळीची विनंती करतेय. उभं राहण्यासाठी ती आपला हात पुढे करत असते. पण कुणीच मदतीसाठी पुढे येत नाही.


मदत करणं तर दूरच, पण समोर असलेले लोक या मुलीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात दंग असल्याचं दिसलेत. या मुलीच्या हातातून रक्त येत होतं. तिला उभंही राहता येत नव्हतं.


जखमी अवस्थेत असलेल्या या मुलीचं वय 12 ते 13 वर्षांच्या दरम्यान, असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, याबाबत कळल्यानंतर एक पोलिसवाला येतो. तो मुलाला आपल्या हातांनी उचलतो आणि तसाच थेट रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतो.

Post a Comment

0 Comments