सिंधुदुर्ग: मगरीचे बरेच व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल होत असतात.
ज्यात मगरी जंगलात, पाण्यात शिकार करताना दिसतात. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला ज्यात मगर चक्क रस्त्यावर दिसते आहे. धक्कादायक म्हणजे हे दृश्य सिंधुदुर्गमधील आहे. हो सिंधुदुर्गच्या रस्त्यावर मगर दिसली आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी-आरोंदा रस्त्यावर रात्री ही मगर दिसली. एका गाडीसमोर ही मगर आली. मगरीला पाहताच गाडीचालकाने गाडी थांबवली.
मगरीला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह त्यांना आवरला नाही. गाडी थांबवून त्यांनी मगरीला कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला ही मगर होतीी
काही वेळात मगरीने शिकार केली. तिच्या जबड्यात एक साप दिसतो. सापाला तोंडात धरून मगर रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि ती झाडांमध्ये गायब होते. जवळपास पाच ते सहा फुटांची ही मगरमगर तेरेखोल नदीतून रस्त्यावर आली होती.
बराच वेळ ती रस्त्यावर ठाण मांडून बसली होती. आता तेरेखोल नदीतील मगर रस्त्यावर दिसू लागल्याने नागरिक दहशतीत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मगरी अशा प्रकारे रस्त्यावर, शेतात फिरू लागल्याने वनविभागाने याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे.





0 Comments