जालना - पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बाळाजी ट्रॅव्हल्सच्या बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
बस ट्रकला घासत दुभाजकावर उलटल्याने हा अपघात झाल्याची महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अपघातात एक प्रवाशी गंभीर झाला असून १० प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना रुग्णलायत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.
अपघातांना नंतर जालना-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. निष्काळजी वाहन चालवल्या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.




0 Comments