मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.
क्रीडा क्षेत्रात आजकाल ट्रेंड सुरु झालाय. खेळाडू मैदानात आपल्या लाईफ पार्टनरला प्रपोज करून लग्नाची मागणी घालतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑलिम्पिक असो अथवा क्रिकेट मॅच अनेक खेळाडूंनी अशाप्रकारे आपल्या पार्टनरला प्रपोज केलं आहे.
व्हायरल व्हिडिओत खेळाडूंच्या याच स्टाईलचा वापर एका फॅन्सने त्याच्या आय़ुष्यात करून पाहिला. त्याने स्टेडिअमवर त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करायचा प्रयत्न केला. सुरूवातीला त्याने किस केलं, मग गुडघे टेकून तिला लग्नासाठी प्रपोज करण्यास सुरुवात केली. मात्र या प्रकाराला संतापत तिने मित्राच्या कानशिलात लगावत त्याच्या चेहऱ्यावर कोल्ड्रिंक फेकले. या घटनेने भर मैदानात तरूणाची फजिती झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अमेरिकन तरुण अलेक्झांडर कोर्डा त्याच्या मैत्रिणीसोबत बेसबॉल मॅच पाहायला गेला होता.या मॅचसाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. तेव्हाच कोर्डाने आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला.आधी कोर्डाने मैत्रिणीला किस केलं, नंतर मग गुडघे टेकून तिला लग्नासाठी प्रपोज करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून मैत्रीण हसत होती आणि आजूबाजूचे लोक कोर्डाला चिअर करत होते. या दरम्यान, कोर्डा खिशातून एक बॉक्स काढतो.
या बॉक्समध्ये अंगठी असेल असे सर्वांनाच वाटले होते, मात्र अंगठीऐवजी त्यात लॉलीपॉप कँडी होती. कोर्डा गर्लफ्रेंडला कँडी रिंग देऊन प्रपोज करत होता. हे पाहून मैत्रिणीला राग आला आणि तिने कोर्डाच्या कानाखाली मारली आणि हातातलं कोल्ड्रीक्स त्यांच्या तोंडावर फेकले. या घटनेने तरूणाची चांगलीच फजिती झाली.
कॅनेडियन पार्टी लाईफ नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.




0 Comments