नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घणसोली इथं एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला पण यातून ती थोडक्यात बचावली. नवरा बायकोच्या भांडणातून तिने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली आहे.
पुष्पा गुर्जर (वय 32 ) असं आरोपी आईचे नाव आहे. दिपू गुर्जर मुलगी (4 वर्षझ तर राहुल गुर्जर (1 वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे. पुष्पा गुर्जरचे तिच्या पतीसोबत नेहमी या ना त्या कारणावरून भांडणं होत होती. याच रागातून रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले.
पुष्पाने रागाच्या भरात आपल्या दोन मुलांची चाकूने आणि ब्लेडने हत्या केली. मुलगी आणि मुलाची हत्या केल्यानंतर तिने स्वतःवर ब्लेडने वार केले. एवढंच नाहीतर पंख्याला गळफास लावून घेतला मात्र पंखा तुटल्याने तिचा जीव वाचला.
पंखा तुटल्याचा आवाज ऐकून इमारतीतील बाकीचे लोक त्याच्या घरी गेले तेव्हा ४ वर्षाची मुलगी आणि १ वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुष्पाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलिसांनी आई आणि मुलांना रुग्णालयात नेले.
जिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले. तर आईला उपचारासाठी वाशी येथील महानगर पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे





0 Comments