धक्कादायक; धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

 रभणी : पूर्णा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या धावत्या बसची एकामागून एक अशी दोन चाकं निखळून पडल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता घडली. या बसमधून आठ ते दहा प्रवासी प्रवास करत होते.


चालकाच्या समय सुचतकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

वसमत आगार बस स्थानकातून वसमत ते धानोरा मोत्या (एम एच १४ बीटी१९५५) ही बस शनिवारी रात्री धानोरा मोत्या येथे मुक्कामी थांबली होती. 


रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास धानोरा मोत्यायेथून वसमतकडे निघाली होती. या बसमध्ये चालक वाहकासह आठ ते दहा जण प्रवास करत होते. राज्य मार्ग २५५ वरून धावत असताना अचानक चुडावा जवळ येताच बसचे मागील एक चाक निखळून पडले. 


मात्र तरीही बस धावत होती. दरम्यान ३३ केव्ही कार्यालयाजवळ येताच दुसरेही चाक निखळून पडल्याने एकदम गाडीचे संतूलन गेले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकांने तात्काळ बसवर ताबा मिळवत बस थांबविली. चालकाने पाहणी केल्यानंतर नट निखळल्याने हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. सुदैवाने ही घटना महामार्गापासून काही अंतरावर घडल्याने मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments