मलकानगिरी - ओडिशात एका महिलेने नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे जीव दिला आहे. या महिलेच्या आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र आत्महत्येचं जे कारण समोर आलं त्याने सगळेच हैराण झाले आहेत.
ही मंगळवारी रात्रीची आहे. मलकानगिरी जिल्ह्यातील एमपीवी १४ गावातील रहिवासी कनहेई मंडलची पत्नी ज्योतीनं आत्महत्या केली. या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते. पती कनहेईनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मी माझी पत्नी ज्योतीला स्मार्टफोन गिफ्ट केला होता. फोन खूप महाग होता. एकसाथ पूर्ण पैसे देणे शक्य नव्हतं. त्यासाठी फोन ईमआयवर खरेदी केला. परंतु ही गोष्ट ज्योतीला माहिती नव्हती.
मी फोनचा अखेरचा हफ्ताही भरला होता. ज्याठिकाणी मी मोबाईल खरेदी केला तिथून ईएमआयचे कागद सहीसाठी घरी आले. तेव्हा EMI बाबत ज्योतीला कळालं.
त्यावरून तिचं माझ्याशी भांडण झाले. ही गोष्ट तू मला का सांगितली नाही यावरून ज्योतीने वाद घातला. आमच्या दोघांचे भांडण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तेव्हा ज्योतीने माझ्यासमोर विष प्यायलं. हे पाहून मी घाबरलो आणि बेशुद्ध पडलो असं पतीने सांगितले.
कनहेई आणि ज्योती या दोघांना कुटुंबातील सदस्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. कनहेईवर उपचार सुरू आहेत. पत्नीच्या मृत्यूने कान्हेला धक्का बसल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे. पतीचा जबाब नोंदवून घेतला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचेही जबाब झाले आहेत. ही आत्महत्या होती की हत्या या अँगलने पोलीस तपास करत आहेत.





0 Comments