प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेने तुमचाही थरकाप उडेल.
दीरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अतिशय क्रुर पद्धतीने काटा काढला.
विशेष म्हणजे या गुन्ह्यात महिलेला दीर आणि सासऱ्याने मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील उमरी गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, महिलेने दीर आणि काका सासऱ्याच्या मदतीने पतीला विष देऊन ठार केले आणि नंतर पतीचे शीर धडापासून वेगळे केले.
यानंतर दीड वर्षे पतीचा मृतदेह घरातच भुश्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला.
दीड वर्षानंतर पतीचा सांगाडा जंगलात फेकून दिला. इथेच महिलेचा गुन्हा उघडकीस आला.





0 Comments