खरं सांगायचं तर, सायली संजीवने ऋतुराज गायकवाडबरोबर रीलेशनशिपच्या चर्चवर मौन

 राठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. काही दिया परदेस या मालिकेतून सायली ही घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.


सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे.


 आता लवकरच सायली ही एक ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.


 नुकतंच सायली ही झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले.

चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएलच्या सामन्यादरम्यान अनेकांनी ऋतुराजच्या खेळावरुन सायलीच्या पोस्टवर कमेंट केल्या होत्या.


 त्यामुळे त्या दोघांचे अफेअर असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल त्या दोघांनीही भाष्य केले नव्हते. मात्र नुकतंच बस बाई बस या कार्यक्रमावेळी सायली संजीवने यावर मौन सोडले.


Post a Comment

0 Comments