बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेसोबत धक्कादायक कृत्य

 

चोरीच्या अनेक घटना दररोज आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. अनेकदा चोरटे गर्दीच्या ठिकाणीही हातचालाखीने चोरी करून पसार होतात. अशीच एक धक्कादायक घटना इंदापूरमधून समोर आली आहे.

घटनेत बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण चोरी केलं.सध्या दिवाळी सण पार पडल्यानंतर सर्वच वाहनांना गर्दी दिसून येत आहे. 


पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. गर्दीचा फायदा घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलांच्या टोळीने शारदा कांबळे या महिलेचं सोन्याचं गंठण लंपास केलं.


मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन तोळ्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले आहे. हा सर्व प्रकार बस स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की स्थानकावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे. बस येताच प्रवासी यात चढू लागले.



याच गर्दीचा फायदा महिलांच्या टोळीने घेतला. एका वयस्कर महिलेनं शारदा कांबळे यांच्या गळ्यातील गंठण काढून घेतलं आणि आपल्या टोळीतील दुसऱ्या महिलेकडे दिलं.

 यानंतर या दोघीही इथून निघून गेल्या. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन महिला चोरट्यांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ह्या महिलांच्या टोळीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांशह नागरिक करीत आहेत.


Post a Comment

0 Comments