आजी-आजोबांची शेवटची इच्छा म्हणून १२ वर्षीय मुलीचा विवाह २६ वर्षाच्या मुलासोबत पण....

 अल्पवयीन मुला-मुलींची लग्न करु नये यासाठी शासनाकडून सतत जनजागृती करण्यात येते. शिवाय अशी लग्न लावून देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाते.

तरी देखील अनेकजण अशा प्रकारे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतात.

अशीच घटना औरंगाबाद शहरातील  लोटा कारंजा येथे उघडकीस आली आहे. एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका 26 वर्षाच्या मुलासोबत लावून देण्यात येत होता. मात्र, घटनेची माहिती दामिनी पथकास मिळताच.

दामिनी पथकाने तत्काळ सिटी चौक पोलिसांची  मदत घेऊन शहरातील लोटा कारंजा येथे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन विवाह रोखला आहे. विशेष म्हणजे मुलीच्या वृद्ध आजी आजोबांची शेवटची इच्छा म्हणून या मुलीचा विवाह लवकर करत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.


पथकाने समजूत काढताच नातेवाईकांनी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नाही अशी हमी दिली आहे. शिवाय अल्पवयीन मुला-मुलींची लग्न करु नका असं आवाहन देखील पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments