आशा गोरक्षनाथ देशमुख (सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
संबंधित महिला मागील महिन्याभरापासून बेपत्ता होती. चाकण पोलिसांत याबाबत तिच्या पतीने तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जमिनीत पुरल्याने कुजलेला हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात रात्री आठच्या सुमारास आणण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.



0 Comments