अमळनेर (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आईसह मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नीम (ता. अमळनेर) येथील समाधान जहाँगीर कोळी यांची पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ८) यांनी
कळमसरेशिवारात वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला लागून असलेल्या भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
जयश्री कोळी या तीनच्या सुमारास कळमसरे बसस्थानकावर मुलीला घेऊन बसल्या होत्या. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेऊन पायी नीम गावाकडे रस्त्याकडे निघाल्या होत्या. दोघींच्या पायात चप्पलही नव्हती. कळमसरे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत उडी मारून या दोघींनी जीवनयात्रा संपविली.




0 Comments