याविषयी प्राथमिक माहिती देताना, अटकरे म्हणाले की युवराज सोळुंके यांनी 27सप्टेंबर रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची मुलगी अपेक्षा ही बेपत्ता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये कळाले की, युवराज सोळुंके यांनी स्वतः त्यांच्या स्वतःच्या सात वर्षीय मुलगी अपेक्षा सोळुंके हिला पोत्यात बांधून वेळु नदीवरील बांधाऱ्यावरून खाली नदीत फेकले होते.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी व मासेमारांनी नदीमध्ये मुलीच्या मृतदेहाचा शोध घेतला मात्र काहीच हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना मदतीला घेत शोध मोहिम सुरू केली. अखेर या संस्थांच्या सदस्यांनी आज दुपारी त्या मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे.


0 Comments