अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
पण घटस्फोटानंतरही दोघांना मुलगा अरहानसाठी एकत्र येताना पाहिलं. घटस्फोटानंतरही अरबाज मलायकाने मुलगा अरहानसाठी चांगली मैत्री ठेवली. पण आता दोघांच्या नात्याने नवीन वळण घेतल्याचं दिसून येत आहे. मलायकाच्या एका वक्तव्यामुळे फक्त अरबाजच नाही तर, तुमच्याही भुवया उंचावतील.
एका मुलाखतीत मलायकाला, 'घटस्फोटानंतर तुझं आणि अरबाजचं नातं कसं आहे?' असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, 'माझे आणि अरबाजमध्ये आता चांगलं नातंआहे. आम्ही दोघेही पूर्वीपेक्षा जास्त समजदार झालो आहोत. आता आम्ही आनंदी आणि शांत आयुष्य जगत आहोत. आमच्या आयुष्यात कायम चांगल्या गोष्टी घडत राहो... अशी प्रार्थना करते.'
अभिनेत्री पुढे म्हणते, 'कधीकधी लोक चांगले असतात परंतु ते एकत्र चांगलं असल्याचं सिद्ध करू शकत नाहीत. त्याच्यासोबत (अरबाज) कायम चांगलं व्हावं असं मला वाटतं...' मलायकाने केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मलायका अरोराने या मुलाखतीत स्पष्टपणे सूचित केले आहे की घटस्फोटानंतर तिचं आणि अरबाज खानचे नाते पूर्वीपेक्षा चांगले झालं आहे. अभिनेत्रीच्या या मुलाखतीमुळे तिचे चाहते प्रचंड खूश आहेत, तर काही सोशल मीडिया यूजर्सने मलायका ट्रोलही केले आहे. यासोबतच मलायकाची ही चर्चा ऐकून बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला वाईट वाटेल, असे काही लोकांचे म्हणणे आहे.



0 Comments