पंढरपूर सिंहगड मध्ये "इलेक्ट्रिकल व्हेईकल आधुनिकता" याविषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "इलेक्ट्रिकल व्हेईकल आधुनिकता" याविषयावर  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 या व्याख्यान मध्ये प्रा. दत्तात्रय घोडके यांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल आधुनिकता या विषयावर विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.


        या व्याख्यानाच्या सुरुवातीस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील यांनी प्रा. दत्तात्रय घोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  या व्याख्यानासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील विभागात द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षांचे विद्यार्थी उपस्थित होते तसेच  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.


 यावेळी बोलताना प्रा. दत्तात्रय घोडके म्हणाले, पुढे येणाऱ्या चार ते पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकलचा महत्व आणि इलेक्ट्रिकल व्हेईकल मधील समस्या कशा कमी केले पाहिजेत या बद्दल विनोदी शैली मध्ये मार्गदर्शन केले व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थांना येणार काळात इलेक्ट्रिकल व्हेईकल मधील संधी काय असणार आहेत या विषयावर संवाद साधला व त्या बद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

 हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. दत्तात्रय घोडके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments