धक्कादायक; लग्नास नकार दिल्यानं विवाहित प्रियकरानं प्रेयसीला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं

 झारखंडची उपराजधानी दुमकातील बहुचर्चित अंकिता हत्या प्रकरणाची आग अजूनही शमली नसताना एका विवाहित प्रियकरानं तरुणीला जिवंत जाळलंय.


घटना जारमुंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालकी गावामधील आहे. इथं प्रेम प्रकरणातून एका तरुणानं तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलंय.


गंभीररित्या भाजलेल्या या मुलीला दुमकातील फुलोझानो वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात  दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. भालकी गावात राहणारी पीडित मारुती कुमारी हिला काल रात्री तिचा विवाहित प्रियकर राजेश राऊतनं पेट्रोल ओतून जाळलं आहे. 


मुलीची प्रकृती गंभीर असून तिला फुलझानो मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मुलीला चांगल्या उपचारांसाठी रांचीतील रिम्स रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.


Post a Comment

0 Comments