तरुणीना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला .... तरुणासोबत भयंकर घडलं

 हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी हीरो काय काय करतात हे तुम्ही फिल्ममध्ये पाहिलंच असेल. तरुणींना इम्प्रेस कऱण्याचा फंडा फिल्मपुरताच नाही तर रिअल लाइफमध्येही पाहायला मिळतो.


किती तरी तरुण तरुणींना आपल्याकडे आकर्षित करण्याची काय काय नाही करत. काही तरुण तर अगदी फिल्ममधील हीरोसारखी स्टाइल मारायला जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तरुणींना पाहताच एक तरुण चालत्या बाईकवर स्टंट करायला गेला आणि त्यानंतर तरुणासोबत जे घडलं ते भयंकर आहे.




व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन तरुण बाईकवर बसून जाताना दिसतात. एक तरुण बाईक चालवतो आहे आणि एक त्याच्या मागे बसला आहे. या तरुणांच्या मागून जाणाऱ्या बाईकस्वारांनी यांचा व्हिडीओ शूट केला आहे

तरुणींना पाहताच बाईकवर मागे बसलेल्या तरुणामध्ये हिरो जागा होतो. तो तरुणींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो स्टंट करायला जातो. तुम्ही पाहाल तर हा तरुण जशा तरुणी दिसतात तसा बाईकवर उभं राहायला जातो.

चालत्या बाईकवर उभा राहून तो दोन्ही हात पसरतो तितक्यात.... पुढे जे घडतं ते पाहून आपल्यालाही धडकी भरते. बाईक हलू लागते, तरुणाचे पायही डगमगू लागतात. त्यानंतर तो चालत्या बाईकवरून कोसळतो आणि धाडकन रस्त्यावर आपटतो.


Post a Comment

0 Comments