11 ऑक्टोबर २०२२ रोजी अमिताभ बच्चन आपला ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी च्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखाच असतो. अमिताभनी आपल्यावरील चाहत्यांचे हे प्रेम लक्षात घेऊनच त्यांना सरप्राइज दिलं.
बिग बी यांनी अर्ध्या रात्री आपल्या जलसा बंगल्याच्या बाहेर आपल्या चाहत्यांची भेट घेतली,त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा चाहत्यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
११ ऑक्टोबरची पहाट म्हणूया की मध्यरात्रीची वेळ म्हणूया... अमिताभच्या जलसा बंगल्याबाहेरचं वातावरण आनंदात न्हाऊन निघालं होतं. अर्थात महानायकाला त्याच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला त्याचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमिताभ यांच्या चाहत्यांपैकी कुणी केक आणला होता,कुणाच्या हातात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बोर्ड होता.
लोक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग जोरजारात बोलत होते. तर कुणी त्यांच्या गाण्यांवर ठेका धरला होता.पण हे सगळं चाहते त्यांच्या आनंदासाठी करत होते मग भले शहनशहा त्यांना दर्शन देवो की न देवो.
पण कालची रात्र चाहत्यांसाठी पर्वणी ठरली जेव्हा मध्यरात्र उलटून गेली असतानाही ८० वर्ष पार केलेले अमिताभ आपल्या चाहत्यांसाठी बंगल्याच्या बाहेर केवळ चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारायला आले. अमिताभ बाहेर येऊन चाहत्यांना भेटले,त्यांनी केकही कापला. मोठ्या आनंदात त्यांनी आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा मान राखत त्या स्विकारल्या. बातमीत सेलिब्रेशनचा व्हिडीओ जोडलेला आहे.




0 Comments