पतीने दिलेल्या तक्रारीवरून विक्रम सुरेश शेटे (रा. तांदूळवाडी, बारामती) व त्याच्या सोबत आलेला साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून पत्नीला आणण्यासाठी जात असताना आरोपी तेथे दुचाकीवरून आला व त्याने फिर्यादीला आडवले. त्यावेळी त्याने तुला लय माज आलाय का, मला शिवीगाळ करतो का म्हणत फिर्यादीच्या पायावर लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने व दगडाने मारहाण केली. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत


0 Comments